Ad will apear here
Next
‘पेटीएम’ची ‘झोमॅटो’सह भागीदारी
मुंबई : पेटीएम या डिजिटल पेमेंट कंपनीची मालकी असलेल्या ‘वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड’ने ‘झोमॅटो’शी भागीदारी करत असल्याचे जाहीर केले असून, त्यांच्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून फूड आणि डिलिव्हरी ऑर्डर करता येणार आहे. या मुळे यूझर्स आता आपल्या पेटीएम अॅपमधून आपले आवडते रेस्टोरंट शोधून तत्काळ खाद्यपदार्थ मागवू शकतील. ही सेवा सध्या दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांसाठी पेटीएम अँड्रॉइड अॅपवर उपलब्ध असून, लवकरच ती संपूर्ण देशात आणि पेटीएम आयओएस अॅपवरदेखील उपलब्ध होईल.

टियर टू आणि टियर थ्री शहरांत ‘पेटीएम’चा मोठा यूझरबेस आहे, जो आपल्या विविध प्रकारच्या दैनंदिन पेमेंटसाठी या सेवा वापरतो. ही नवी सेवा दाखल करून ‘पेटीएम’ने आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फूड ऑर्डरिंगची सुविधा दिली आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या विशाल यूझर-बेसद्वारा या सुविधेचा अंगिकार होऊन कंपनीच्या वृद्धीस हातभार लागेल.

‘पेटीएम’च्या उपाध्यक्ष रेणू सत्ती म्हणाल्या, ‘झोमॅटोसह भागीदारीच्या मदतीने आमच्या अॅपवरून ऑनलाइन फूड ऑर्डरकरण्याची सोय झाली आहे. आमच्या ग्राहकांपैकी मोठ्या प्रमाणातील ग्राहक हे टियर टू आणि टियर थ्री शहरांतील आहेत. आम्हाला विश्वास आहे, की या सहयोगानंतर ऑनलाइन फूड ऑर्डरिंगमधील वाढ आम्ही आणखी जोमाने पुढे नेऊ. आमच्या ग्राहकांना सर्व प्रकारची सेवा देण्याच्या आमच्या प्रयासातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही या दिशेने आमचे प्रयत्न सदैव सुरू ठेवू.’

‘झोमॅटो फूड डिलिव्हरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित गुप्ता म्हणाले, ‘पेटीएम हा सर्वाधिक लोकप्रिय पेमेंट मंच आहे, ज्यांची पोहोच देशाच्या कान्या-कोपऱ्यापर्यंत आहे. त्यांच्याशी भागीदारी करून आमची ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा त्यांच्या मोबाइल अॅपशी जोडण्यास आम्ही उत्सुक आहोत. यामुळे आम्ही आणखी मोठ्या यूझर-बेसपर्यंत पोहोचू शकू आणि ‘झोमॅटो’वरून ऑर्डर करण्याचा एकंदर अनुभव अधिक चांगला करू शकू.’

या सहयोगामुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी सुलभ मोबाइल पेमेंट सक्षम करण्याच्या ‘पेटीएम’च्या मोहिमेस आणखी बळकटी येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZMEBW
Similar Posts
‘पेटीएम’तर्फे ‘गेमपिंड फॅंटसी स्पोर्ट्स’चे सादरीकरण मुंबई : ‘पेटीएम’च्या ‘गेमपिंड’ या डिजिटल गेमिंग मंचातर्फे क्रिकेट प्रेमींसाठी आणि कार्ड गेमच्या चाहत्यांसाठी ‘गेमपिंड फॅंटसी स्पोर्ट्स’च्या सादरीकरणाची घोषणा केली आहे. ‘गेमपिंड’ने देश-विदेशांतील उच्च गुणवत्तेच्या स्टुडिओज आणि प्रकाशकांशी भागीदारी केली आहे.
‘यूपीआय’साठी पेटीएम सुरक्षित व्यासपीठ मुंबई : देय, बॅंकिंग, कर्ज आणि विमा भरण्याची सेवा देणारी भारताची सर्वात मोठी मोबाइल-फर्स्ट आर्थिक सेवा कंपनी पेटीएम यूपीआय व्यवहारांसाठी सर्वात सुरक्षित व्यासपीठ आहे.
‘पेटीएम’तर्फे व्यापाऱ्यांसाठी ‘इन्स्टंट बँक सेटलमेंट’ सेवा मुंबई : डिजिटल पेमेंट मंच असलेल्या ‘पेटीएम’ने आपल्या भागीदार व्यापाऱ्यांसाठी ‘इन्स्टंट बँक सेटलमेंट’ सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे व्यापाऱ्यांना आपला दैनिक कॅश फ्लो सुधारून व्यापार वाढवण्यात सहकार्य मिळणार आहे. आपल्या ऑफलाइन दुकानांत ‘पेटीएम’द्वारे पेमेंट स्वीकारणाऱ्या ९.८ दशलक्षपेक्षा जास्त व्यापाऱ्यांना
‘पेटीएम’चे सोप्या फीचर्ससह अद्ययावत अॅप मुंबई : ग्राहक आणि व्यापाऱ्यांना व्यापक स्वरूपात देयक सुविधा प्रदान करणारे भारतातील अग्रणी पेमेंट गेटवे पेटीएमने अधिक सोयीस्कर आणि युजर फ्रेंडली बनविण्यासाठी अॅपचे पुनर्निर्माण केले आहे. अॅपच्या अद्यतनाद्वारे पैसे हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद झाली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language